कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा पशु पालकांना लाभ घेण्याचे आवाहन

An appeal to animal parents to take advantage of poultry training

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्र. 2 उद्घाटन शैलेंद्र विश्वासराव पाटील व महिला प्रशिक्षणार्थी लता सुनील लामकाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सधन कुक्कुट विकास गटाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.स्त्रेहंका बोधनकर यांनी कुक्कुट पालनास चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण तुकडी 12 डिसेंबर 2023 अखेर चालणार असून जिल्ह्यातील पशु पालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. शेतीपूरक जोड व्यवसायास चालना मिळण्यासाठी व त्यातून पशुपालकांचे अर्थार्जन होण्यासाठी प्रशिक्षण देणार असून यातून शेतमजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसाय सुरू करूण्याची संधी लाभणार आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यसाठी एस. पी. माने, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व जमादार, परिचर यांनी परिश्रम घेतलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *