करमाळा (सोलापूर) : घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. करमाळा तालुक्यात रमाई आवास योजनेसाठी ४५० घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले असून या घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.
गटविकास अधिकारी राऊत म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यात रमाई आवास योजनेतुन ४५० घरकुल देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी करमाळा पंचायत समितीत लाभार्थ्यांनी कागदपत्रांसह अर्ज करावेत. या उद्दिष्ठामध्ये मातंग समाजासाठी ११२ व मातंग समाज वगळून अनुसूचीत जाती व नवबौद्ध संवर्गात ३३८ लाभार्थ्यांना घरकुलं दिली जाणार आहेत.
लागणारी कागदपत्रे
तहसीलदार यांच्याकडील जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा वयअधिवास दाखला, जागेचा उतारा (स्वमालकीचा व आवश्यक क्षेत्रफळाचा नमुना नं. ८), ग्रामसभा ठराव, रेशन कार्ड, विस्तार अधिकारी यांचा स्थळपहाणी दाखला, रोजगार हमीचे जॉब कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, आधार कार्ड व लाभार्थी एसईसीसी २०११ च्या सर्व्हे बाहेरील आहे किंवा नाही ग्रामसेवक दाखला.