करमाळा (सोलापूर) : कंदर येथील पवार वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदी बाजार भरवण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने टाकून त्यांनी एक दिवसासाठी व्यापाऱ्याची भूमिका साकारली. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता दैनंदिन जीवनातील व्यवहाराची ओळख व्हावी या उद्देशाने हा आंनदी बाजार भरवण्यात आला होता. याचे उद्घाटन केंद्रप्रमुख साईनाथ देवकर, मुख्याध्यापक पोपट चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ व त्याची मांडणी पाहून पालकांनी कौतुक केले. या बाजार डे च्या आयोजनाबद्दल मुख्याध्यापक पोपट चव्हाण, शिक्षिका रेश्मा पारखे यांचा सन्मान करण्यात आला.
कंदरमधील पवार वस्ती शाळेत आनंदी बाजार
