करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर आता जगताप गटाने देखील माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज (सोमवारी) बाजार समितीच्या कार्यालयात भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी जगताप गटाच्या कार्यकर्त्यांना सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्यामुळे हा कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वात प्रथम जगताप यांनी केले होते. मात्र त्यानंतरही या निवडणुकीसाठी तब्बल 272 जणांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ एप्रिलपर्यंत मुदत आहे. मात्र त्यापूर्वीच जगताप यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरवले आहे.