Any goal can be achieved if one is willing to work hardAny goal can be achieved if one is willing to work hard

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं की विद्यार्थ्यांना खूप टेंशन येतं. पण योग्य नियोजन, अभ्यास अन् परिश्रम घेण्याची तयारी असेल तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. त्यासाठी मित्र परिवार, मोबाईल किंवा सोशल मीडियापासून दूर राहण्याची गरज नाही. फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून परीक्षेची निवड करण्याची गरज आहे, असा सल्ला इंडियन फॉरेन सर्व्हिसेस (आयएफएस) अंतर्गत मेक्सिको येथे कार्यरत असलेल्या प्रसाद शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.

चाणक्य आयएएस अकॅडमी, कर्वे रोड, पुणेच्या वतीने माजी विद्यार्थी तथा नुकतेच इंडियन फॉरेन सर्विसेस मधून भारत सरकारच्या सेवेत मेक्सिको येथे रूजू झालेल्या प्रसाद शिंदे (AIR 287) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाणक्य आयएएस अकॅडमी पुणे रिजनचे हेड डॉ. अमित मेढेकर, अकॅडमी कोऑर्डिनेटर मेघा देशपांडे, मार्केटिंग मॅनेजर नीलेश बागल आदींसह विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसाद शिंदे म्हणाले, IAS ची तयारी करतानाचे आयुष्य आणि IFS झाल्यानंतरचे आयुष्य हे पूर्णपणे वेगळे आहे. या परीक्षेची तयारी करताना आधी मी पार्ट टाईम काम करत होतो. पण नंतर मी पूर्णपणे अभ्यासाला सुरूवात केली. दिवसातील किमान 12 तास मी अभ्यास केला. तसेच शनिवार, रविवार हा माझा ‘मी टाईम’ होता. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मित्र परिवार, मोबाईल किंवा सोशल मीडिया पासून दूर राहण्याची गरज नाही.

पूर्वी युपीएससी  मध्ये महाराष्ट्राचा टक्का कमी होता मात्र, अलीकडे चित्र बदलले आहे. युपीएससी  मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढतोय. विद्यार्थी नेहमीच आधी डॉक्टरेट, इंजिनियरींग करतात. अन् स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन बी म्हणून बघतात. किंवा कुटूंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. मात्र असे अजिबात करू नका. तुम्हाला यामध्ये करियर करण्याची इच्छा असेल तरच या क्षेत्राकडे वळा. यासाठी फक्त विद्यार्थ्यांनी स्वतः मधील क्षमता आणि कल ओळखण्याची गरज आहे, सूचक सल्ला प्रसाद शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या  विद्यार्थ्यांना दिला.

चाणक्य आयएएस अकॅडमी पुणे रिजनचे हेड डॉ. अमित मेढेकर म्हणाले, वैयक्तिक लक्ष, योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना कोणतेही लक्ष साध्य करणे शक्य आहे. चाणक्य आयएएस अकॅडेमी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. चाणक्यमध्ये विद्यार्थी आला की आम्ही त्याचा कल आणि आकलन क्षमता लक्षात घेवून त्यांना तयार करतो.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *