सोलापूर : बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीत 17 मार्चला एसटी स्टँडच्या पाठीमागे नाळे प्लॉट समोर ट्रान्सपोर्टसमोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 वर्षे वयोगटातील मृत अवस्थेत मिळून आला होता. सदर बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांचा तपास केला असता, कोणतीही माहिती न मिळाल्याने पोलिस विभागाने मृतदेहाचे बार्शी येथील सरकारी दवाखन्यात पोस्ट मार्टम करून, बार्शी नगरपालिकेच्या वतीने बेवारस म्हणून धार्मिक अंत्यविधी करण्यात आला आहे. याबाबत सदर मयताच्या नातेवाईकांनी बार्शी शहर पोलिस ठाणे येथे संपर्क करावा, असे आवाहन सहा.पोलिस निरिक्षक एम. ए. गळगटे यांनी केली.

