Appeal to take advantage of the Golden Jubilee Tribal Scholarship Scheme

सोलापूर : पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे. आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिकांच्या शाळामधील अनुसूचित जमातीच्या 1 ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ग्रामविकास व नगर विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. सदर योजना राबविण्यासाठी शाळेतील‍ मुख्याध्यापक यांनी शासन निर्णयातील अटी व शर्ती पुर्ण करणारे पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नमुद अर्जाच्या नमुन्यात गट शिक्षण अधिकारी तसेच महानगरपालिका हद्दीतील शाळा यांनी महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे तात्काळ सादर करावेत.

तसेच गट शिक्षण अधिकारी व महापालिकेच्या प्रशासन अधिकारी यांनी सर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, यांच्याकडे सादर करावेत. शिष्यवृत्ती योजनेपासून एकही पात्र अनुसूचित जमातीचा विद्यार्थी वंचित राहणार नाही याची सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा, नगरपालिका नगरपरिषद व महानगरपालिकांच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी. सदर योजनेच्या माहितीकरिता प्रभारी सहा.प्रकल्प अधिकारी (शिक्षण), विशाल सरतापे. मो.नं.8668774254, व लिपिक टंकलेखक चंद्रकांत वाघमारे मो.नं.9403493763 अथवा ई-मेल-posolapursdist@yahoo.com वर संपर्क साधावा असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, धनंजय झाकर्डे यांनी कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *