आदिनाथच्या प्रशासक मंडळात महेश चिवटे व गुटाळ यांची नियुक्ती

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांच्यानंतर आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची प्रशासक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिले आहे. ‘हा कारखाना सक्षमपणे सुरू करण्यासाठी सावंत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील,’ असे चिवटे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. सोनारी येथे त्यांनी हे पत्र स्वीकारले आहे़. मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *