करमाळा (सोलापूर) : तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले आहेत. कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणांस्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू नयेत, याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकावर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा अशा सूचना आहेत. या योजनेबाबत बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक हेल्पलाईन क्रमांक व अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यात संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण अधिकारी मिथुन पवार (मो. नं. 9527341147) व विस्तार अधिकारी संदिप रणदिवे (मो. नं. 7387294383) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर वरील संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.