करमाळा (अशोक मुरूमकर) : रिक्षात प्रवासी बसण्याच्या कारणावरून जेऊर येथील चिखलठाण चौकात रिक्षा चालकांचा वाद झाला आहे. यामध्ये रिक्षा तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी (ता. ११) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडला. अमोल प्रभाकर खराडे, जयराम प्रभाकर खराडे व रोहित बाळू तोरणे (रा. जेऊर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये रिक्षा चालक अंकुश देवराम केंगार (वय ४५, रा. चिखलठाण रोड, जेऊर, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास जेऊर येथील चिखलठाण चौकात रिक्षा स्टॅण्डवर केंगार यांची रिक्षा उभी होती. त्यांचा प्रवासी बसवण्याचा क्रमांक आला, तेव्हा गाडीत प्रवसी बसवत असताना गुन्हा दाखल झालेला अमोल खराडे तेथे मध्येच रिक्षा घेऊन आला व प्रवाशांना बसवू लागला. त्याला केंगार यांनी माझा नंबर आहे तू हे प्रवासी घेऊन जाऊ नको, असे सांगितले. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी शिवीगाळ करू लागले. त्यांना समजावून सांगत असताना मारहाण केली. एकाने हातात दगड घेऊन डोक्यात मारले. हातावर व गुडघ्यावर त्यांनी काठीने मारहाण केली.