करमाळा (सोलापूर) : उन्हाचा चटका वाढत असल्याने वन्य प्राण्याची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वन विभागाच्या पाणवट्यात पाणी सोडले आहे. सचिन गायकवाड यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरु केला आहे. करमाळा शहराजवळ असलेल्या वन विभागाच्या पाणवट्यात टँकरने पाणी सोडून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
वन्य प्राण्याची पाण्यासाठी वणवण होऊन नये म्हणून वन विभाग पाणवट्यात पाणी सोडतो. मात्र सध्या दुष्काळ आहे, त्यात वन्यप्राण्यासाठी आपलाही हातभार असावा म्हणून कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत टँकरने पाणवट्यात पाणी सोडले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.