31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क पुर्नस्थापित! राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 27 हजार 320 प्रकरणे सामंजस्याने निकाली

सोलापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 2025 मधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी (10) झाली. यामध्ये 27 हजार 320 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणामधील तडजोडी मुल्य 149 कोटी 18 लाख 63 हजार 16 राहीले. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून 31 जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्याने पुर्नस्थापित झाले.

2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाले. जिल्हा न्यायाधीश आर. जे. कटारिया, जिल्हा न्यायाधीश वाय. ए. राणे, जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे, जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग रजपूत, सोलापूर वकिल संघाचे अध्यक्ष व्ही. पी. शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधिर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे आदी यावेळी उपस्थित होते.

सोलापूर महापालिकेतील सहाय्यक मुख्य निरिक्षक करसंचलन अधिकारी युवराज गाडेकर, करनिरक्षक दिलीप देशमुख, कार्यालयीन अधिक्षक सुर्यकांत खसगे व बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, विधिज्ञ एस. एस. गायकवाड व रिकव्हरी अधिकारी आदित्य गवळी व बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजिव कुमार व विधिज्ञ श्रीमती व्ही. ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले. आभार दिवानी न्यायाधीश विरिष्ठ स्तर श्रीमती एम. के. कोठुळे यांनी मानले.

सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून 4 हजार 916 प्रलंबित प्रकरणे दाखल केली. 22 हजार 404 प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये 15 वर्षे जुनी 01, 10 वर्षे जुनी 11, 5 वर्षे जुनी 951 अशी 963 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनापुर्वी 5 ते 9 मे दरम्यान प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *