करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या आशा देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पॅनल प्रमुख किरण पाटील यांच्यासह जगताप व शिंदे गटाचे माजी उपसरपंच सतीश पवार, नारायण पाटील गटाचे इतर सर्व सदस्य माजी सरपंच लोचना पाटील, माजी सरपंच लक्ष्मी सरवदे, अनिता भोसले, कविता होगले पाटील आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद बनसोडे यांनी काम पहिले. सहायक म्हणून तलाठी मयूर क्षिरसागर, सहाय्यक सोमनाथ खराडे, ग्रामसेवक रवींद्र काळे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सरवदे यांनी केले. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.