यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आश्लेषा बांगडेला सुवर्णपदक

Ashlesha Bangde of Yashwantrao Chavan College wins gold medal

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील लोणीकंद येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनीने यश मिळवले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आश्लेषा बागडे हिने महिला मल्लांना चितपट करीत अंतिम फेरीत प्रवेश करून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत ५७ किलो वजन गटांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावून वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बागडे ही विहाळ येथील महाविद्यालयामध्ये बीए 2 मध्ये ती शिकत आहे.

वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ६ ते ८ डिसेंबरला कर्नाटकमध्ये (बेंगलोर) होणार असून ५७ किलो वजन गटांमध्ये आश्लेषा बागडे ही महाराष्ट्रातर्फे नेतृत्व करणार आहे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रम सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. राम काळे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *