आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव नोटीस प्रसिद्ध

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची एनसीडीसीने (राष्ट्रीय सहकारी विकास निगम) ‘सरफेसी’अंतर्गत ई- लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. थकीत कर्ज वसूल करण्यासाठी २२ मे रोजी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात हा साखर कारखाना आहे.

प्रसिद्ध झालेल्या नोटिशीनुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे एनसीडीसीचे ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये देणे आहे. कारखान्याने ९५ हेक्टर ७४ आर क्षेत्रासंबंधित सर्व हक्क व संबंधित क्षेत्रावर सध्यस्थितीत व भविष्यात उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारती व त्यावरील सर्व स्थिर फिटिंग्ज याचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय कारखाना, डिस्लरी, को- जनरेशन वीजप्रकल्प, साखर मील आदीशी संबंधित यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *