करमाळा (सोलापूर) : ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यात आलेले १९ हजार ३१० रुपये परत करत करमाळ्यात प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. माजी नगरसेवक संजय सावंत व भगवान सावंत यांची कपडे गजराज ड्रायक्लीनला टाकली होती. तेव्हा भगवान सावंत यांच्या पॅन्ट खिशामध्ये ९०० तर माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या खिशामध्ये १८ हजार ४१० रुपये सापडले. त्यानंतर गजराज गजराज डायक्लिनर्सचे सावरे यांनी त्यांना फोन करून पैसे ताब्यात दिले. तेव्हा सावरे यांचा त्यांनी सत्कार केला. संदीप व सुधीर सावरे यावेळी उपस्थित होते.
