मुलांना खाऊ घेईपर्यंत मोटारसायकल्याच्या हॅण्डलला अडकवलेली लाखाची रोकड असलेली बॅग लंपास

करमाळा (अशोक मुरूमकर) : मुलांना खाऊ घेईपर्यंत मोटारसायकलच्या हॅण्डलला अडकवलेली एक लाखाची रोखड असलेली बॅग चोरटयांनी लंपास केली आहे. हा प्रकार करमाळ्यातील केत्तूर नाका परिसरात गुरुवारी (ता. ८) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला आहे. यामध्ये रोशेवाडी येथील रघुनाथ गोरख रेगुडे (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रेगुडे हे बँकेतून रोखडकाडून घरी जात होते. काढलेली एक लाखाची रोखड त्यांनी एका पिशवीत ठेवली होती. केत्तूर नाका येथे आल्यानंतर मुलांना खाऊ घेण्यासाठी ते एका दुकानात गेले. तेव्हा त्यांनी ५०० रुपयांच्या २०० नोटाची रोखड असलेली पिशवी गाडीच्या हॅण्डलला अडकवून ठेवली. खाऊ घेऊन आले तेव्हा पैशाची बॅग दिसली. नाही त्यांनी परिसरात त्याचा शोध घेतला मात्र सापडली नाही. याचा तपास करमाळा पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *