करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर शनिवारी (ता. 7) सकाळी 8 वाजता बकरीद ईदची नमाजपठण होणार आहे, अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी यांनी दिली आहे. शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. समाज बांधवांनी ईदची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात कुर्बानी करावी व कुर्बानी केल्यानंतर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडियावर प्रसारित करु नये. परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा व सरकारने दिलेल्या अटी व शर्तीचे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करत भक्तिभावाने ईद साजरा करावा, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
ईमित्याज पठाण, मुस्तकीम पठाण, जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, ऍड. नईम काझी, समीर शेख, समीर बागवान, जहांगीर बेग, इकबाल शेख, फिरोज बेग, आलिम खान, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, अलीम शेख, सोहेल पठाण, अमीर शेख, सुपरान शेख, अय्युब शेख, इन्नुस मुजावर उपस्थित होते.