करमाळा (सोलापूर) : साडे येथे करमाळा तालुका बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत बाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कबड्डी स्पर्धेत लहान गटाने (मुली) अंतिम विजय मिळवला. 100 मीटर रनिंगमध्ये सार्थक नलवडे हा दुसरा आला आहे. सदर अंतिम कबड्डी सामना वरकटणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाविरुद्ध बाळेवाडी यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत बाळेवाडी शाळेने विजय मिळवला आणि प्रथमच बीट स्तरावर बाजी मारली. यासाठी बाळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक जयंत देशमुख, क्रीडाशिक्षक अभिजीत गायकवाड तसेच रेश्मा कुरबू, काझी, पुष्पा नगरे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ बाळेवाडी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४