करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी नुकसान भरपाईत गैरव्यहावर झाला असून केळीचे अनुदान लुटले असल्याचा आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे लोकशाही दिनात केली आहे. त्यावर त्वरित चौकशी करण्याची सूचना त्यांनी कृषी विभागाला केली आहे.
चिवटे म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले होते. मात्र ज्यांनी कधी केळी लागवड केली नाही त्यांना केळी नुकसान भरपाई मिळाली आहे. तलाठ्यांनी खोटे बनावट पंचनामे करून ठराविक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळवून दिली. या सर्व प्रकाराची खाते चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
तहसीलदार ठोकडे व सर्व विभागाचे खाते प्रमुख यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात लोकशाही दिना निमित्त सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व तक्रारी समजावून घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत केळी अनुदान व शहरातील अतिक्रमण यावर चर्चा झाली. मे 2024 मध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जागेवर पडल्या होत्या. तेव्हा शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान वितरित करणे सुरु आहे.
उमरड येथे केळी उत्पादक शेतकरी व संबंधित एजंट यांच्यात यावरून वाद झाला असल्याचे चिवटे यांनी बैठकीत सांगितले. तालुका कृषी कार्यालयाने नुकसानीचा गोषवारा दिला होता. परंतु पंचनामा करताना काही तलाठ्यांनी शेतकऱ्यांशी व एजन्सी तडजोड करून ज्यांच्या शेतात केळी नाही अशा शेतकऱ्यांची
वे यादीत घेतल्याचा आरोप चिवटे यांचा आहे.