करमाळा (सोलापूर) : शहरातील विविध समस्याबाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेसमोर सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) घंटानाद आंदोलन झाले. दरम्यान मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी त्वरित कामे केली जातील, असे आश्वासन दिले.
सावंत म्हणाले, करमाळा शहरात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाच- पाच दिवस पाणी भेटत नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे शहरातून जातात. खड्डयात पडुन कोणतीही इजा होऊ नये त्यामुळे खड्डे बुजवण्यात यावेत. गटारी भरल्या आहेत. कचरा साचलेला असून स्वच्छता करण्यात यावी. जंतू नाशक पावडरची त्वरित फवारणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
माजी नगरसेवक फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, माजी नगरसेवक दीपक सुपेकर, भारिपचे देवा लोंढे, हुमरान मुलाणी, गणेश अडसूळ, पांडुरंग सावंत, साजीद बेग, विलास क्षिरसागर, साबीर नजीर शेख, बापू मोरे, जमीर सय्यद, राजेंद्र कसाब, बापू उबाळे, भाऊ दुधाळ, जमील काझी, संभाजी गायकवाड, मार्तंड सुरवसे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस कर्मचारी बिभीषण जाधव, गणेश दळवी, भाऊसाहेब शेळके, गणेश शिंदे यांनी आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवला होता.