करमाळा (सोलापूर) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा भीमदल संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्या विधानाने नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या शहा यांनी गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे पाईक आणि भीमसैनिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलने करतील, असा इशारा भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी दिला आहे.
भोसले म्हणाले, ‘अमित शहा यांचा पूर्वीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असणारा तिरस्कार हा त्यांच्या विधानातून दिसत आहे. देशांमध्ये सहनशीलता राखायची असेल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता आपण माफी मागून ग्रहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.’