भीमदलचे सुनील भोसले विधानसभा निवडणूक लढणार

Sunil Bhosle

करमाळा (सोलापूर) : भीमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जाणार असून रणनीती आखली जाणार असल्याचेही त्यांनी भोसले यांनी सांगितले आहे.

सुनील भोसले हे लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे उमेदवार होते. मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केले तेव्हा करमाळा येथून सकल मराठा समाजाचे संभाव्य उमेदवार म्हणून भोसले यांचे इच्छुकांमध्ये नाव होते. एका वर्तमानपत्रात हे नाव देण्यात आले होते. मात्र पुन्हा जरांगे यांनी निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले होते.

भोसले म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांची कामे केली आहेत. अन्यायाविरुद्ध आम्ही काम करत असून या निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत. सर्व बांधवांच्या आणि समाज्याच्या बरोबर राहून संघटना काम करत आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *