करमाळा (अशोक मुरूमकर) : चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या परिवाराकडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर या रस्त्याच्या भूमीपूजनासाठी चिखलठाण नं. १ येथे आज (सोमवारी) आमदार शिंदे हे आले होते. या कामासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर झाले आहेत. आमदार शिंदे यांच्या हस्ते या कामाची सुरुवात झाली.
दरम्यान बारकुंड परिवाराने आमदार शिंदे यांचे भव्य स्वागत करत केक कापत वाढदिवस साजरा केला. आमदार शिंदे यांचा ३१ जुलैला वाढिवस आहे. शिंदे हे वाढदिवसाच्या आधी दोन दिवस गावात आल्याने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयातील शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. याबरोबर विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले.
बारकुंड म्हणाले, आमदार शिंदे यांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. त्याचे भूमीपूजन आज झाले. दोन दिवसांनी त्यांचा वाढिवस आहे. त्यामुळे आम्ही भव्य स्वागत करत आमदार शिंदे यांचा वाढिवस साजरा केला आहे. यावेळी आनंद पोळ, गणेश कानगुडे, संतोष सरडे, मारुती गुटाळ, दत्तात्रय बारकुंड, हेमंत बारकुंड, श्रीनाथ गव्हाणे, समाधान गव्हाणे, राजेंद्र चव्हाण, संतोष उंबरे, मुख्याध्यापक श्री. वायदंडे आदी उपस्थित होते. ADVT