करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने बिटरगाव श्री येथे चार बाकडे भेट देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गावातील तरुणांच्या मागणीनुसार एसटी स्टँड येथे ही बाकडे बसवण्यात आली आहेत. येणाऱ्या काळात पांडुरंग वस्ती येथेही बाकडे दिली जाणार असल्याचे प्रा. झोळ यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांच्या माध्यमातून प्रा. रामदास झोळ फंडेशनचे तालुक्यात सामाजिक काम सुरू आहे. उन्हाळ्यात त्यांच्या वतीने पाणी टँकरही सुरू होते. तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत अनेक गावात त्यांनी नगरिकांना बसण्यासाठी बकडे दिले आहेत. पोथरे, जातेगाव, बिटरगाव श्री, करमाळा येथील शासकीय कार्यालये येथेही त्यांनी बाकडे दिली आहेत. तालुक्यात प्रत्येक गावात बाकडे देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रा. झोळ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असे कार्यकर्त्यानी नुकतेच आवाहन केले होते. त्यात प्रा. झोळ यांच्याकडून गावागावात सामाजिक कामांच्या माध्यमातून भेटी देण्यावर भर दिला जात आहे. आता तालुक्यात 60 गावांमध्ये बाकडी देण्यात आली असून माढा तालुक्यातील 36 गावांमध्येही बाकड्यांची मागणी होत असून सामाजिक काम या भावनेतून ही बाकडी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.