दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत भाजपची दत्त पेठेत प्रचार फेरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात भाजपची आज (मंगळवार) मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, संजय शिलवंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता देवी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार या फेरीवेळी उपस्थित होते.

ढोल- ताशाच्या गजरात ही फेरी दत्त पेठेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील भाजपचे परणे लक्ष वेधत होते. फेरीत दोन्ही बाजूंच्या दुकानदारांना भेटून यावेळी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सुभाष चौक, दत्त पेठ मार्गे, श्री छत्रपती चौकात येथे ही फेरी आली. यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह भाजप व बागल गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *