वरकटणे (सोलापूर) : वरकाटणे येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री भैरवनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्ती निमित्त रक्तदान शिबीर झाले. या शिबिरात पंचक्रोशीतील तरुणांनी सहभाग घेत १६० तरुणांनी रक्तदान केले. कमलाभवानी ब्लड सेंटरचे यासाठी सहकार्य मिळाले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गावातील मान्यवरांच्या हस्ते झाले. रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ, पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. ‘आपण दिलेले रक्त कधी, कुठे, कोणाचे प्राण वाचवेल हे आपल्यालाच माहीत नसते; त्यामुळे रक्तदानाची सवय लावून घ्या’, असे आवाहन केले. सामाजिक उपक्रमासाठी वरकटणे ग्रामस्थांनी एकजुटीने मेहनत घेतली. शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी नियोजन व कार्यवाहीत विशेष सहभाग नोंदवला.