संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २२५ जणांचे रक्तदान

करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबीरात २२५ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले.

याप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक महादेव बिराजदार महाराज, क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार, टेंभूर्णी ब्रँचमुखी अनिल पवार, खरेदी विक्रि संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप, कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सरपंच रविंद्र वळेकर, प्रमोद बदे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर, वैशाली सरडे, मुकुंद साळूंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, एकनाथ निमगीरे, मनधीर शिंदे तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले. पोपट थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *