करमाळा (सोलापूर) : कुणबी दाखल काढण्यासाठी आवश्यक असलेला मंडळ अधिकाऱ्याचा चौकशी अहवाल देण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या घटनेमुळे करमाळा तालुक्यात खळबळ माजली आहे.
करमाळा तालुक्यात कुणबी दाखले मोठ्या प्रमाणत वितरित झाले आहेत. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वतः लक्ष घालून शिबिरे घेते विना एजंट काम करत थेटपणे दाखले वितरित करण्यावर भर दिला होता. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोणाची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून थेट संपर्क साधण्याचेही आवाहन केले होते. एसीबी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केत्तूर येथील मंडळ अधिकाऱ्याने एका दाखल्याचा चौकशी अहवाल देण्यासाठी तीन हजार लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थी आणि मंडळ अधिकारी यांच्यात तडजोड करत १० हजार लाच देण्याचे ठरले. दरम्यान एसीबीने सापळा लावून लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्याला पकडले. त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिरा सुरु आहे.