कुर्डूवाडी (अशोक मुरूमकर) : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले संविधान हे कोणीही बदलणार नाही, विरोधकांचा हा खोटारडा प्रचार असून समाजात ते वाद निर्माण करत आहेत. संविधानाला कोणीही हात लावणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मीही आहे,’ त्यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
कुर्डूवाडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, आमदार प्रसाद लाड, शिवाजीराव सावंत, सुनील सर्वगोड, सोमनाथ भोसले, बापूसाहेब जगताप, नागनाथ ओहोळ, चंद्रकांत वाघमारे, महेश चिवटे, दत्ता काकडे, अरविंद पवार, प्रकाश गोळे, अमरकुमार माने, जगन्नाथ क्षीरसागर, रवींद्र ननावरे, व्यंकटेश पाटील, कैलासराव गोरे, सूर्यकांत गोरे, अजय बागल, मोहम्मद आयुब मुलानी, लतीफ मुलानी, स्वाती गोरे, उमेश पाटील, योगेश पाटील, बाबासाहेब गवळी, निवृत्ती गोरे, योगेश पाटील, निवृत्ती गोरे, अर्जुनराव बागल, डॉ. मोहसीन मकनु, कैलास खंडाळे उपस्थित होते.

आठवले म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माझे चांगले संबंध आहेत. १० वर्ष आम्ही येथे काम केले. सर्व समाज बांधवांनी मला चांगले मतदान केले. माझ्यावर तुम्ही जसे प्रेम केले तसेचा आता निंबाळकर यांच्यावर करायचे आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी चांगले काम केले असून त्यांच्यावर मोदींनीही विश्वास टाकलेला आहे. ‘धैर्यशिल यांच्यात धैर्य नाही कारण मी त्यांच्याबरोबर नाही’, असे म्हणत त्यांनी मोहिते पाटील यांना टोला लगावला. विजयदादांनी हा निर्णय घेईला नको होता. त्यांना काहीतरी मिळाले असते, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘शरद पवार यांच्यामुळे मी मंत्री झालो हे खरे पण १९८९ ला आम्ही पाठींबा दिला नसता तर काँग्रेसचे सरकार आले नसते. हे शरद पवार यांना माहित होते म्हणून मला मंत्री केले होते.’ ‘आता मोदींची देशात लाट आहे. देशाच्या विकासाठी ते राबत आहेत’, असेही ते म्हणाले आहेत. ‘उद्धव ठाकरे यांचा तोल गेला आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. संजय राऊत हे काहीही बोलत आहेत. तुम्ही तुमचे आमदार सांभाळु शकला नाहीत. तुम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवे होते, अदित्य ठाकरे यांना लहान वयात मुख्यमंत्री करणे योग्य नाही’, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘अजित दादांची भाजपबरोबर जाण्याची ईच्छा होती. मात्र शरद पवार यांनी त्यांचे एकले नाही. आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे स्वागत आहे, कोणी काहीही म्हटले तरी आमच्या ४० जागा येतील. निंबाळकर व सातपुते या दोघांनाही निवडुन आणायचे आहे’, असे आठवले म्हणाले आहेत.