करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ या दिग्ग्जांसह ३५ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची उद्या (बुधवारी) छाननी होणार असून सोमवारपर्यंत (४ नोव्हेंबर) अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी 31 ऑक्टोबर सकाळी 10 ते 6 व ४ नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अशा दोनच तारखा आहेत. मधल्या कालावधीमध्ये दिवाळीची सुट्टी असल्यामुळे शासकीय सुट्टी असल्याने अर्ज माघारी घेता येणार नाहीत.
करमाळ्यासाठी पहिल्याच दिवशी दोघांचे अर्ज दाखल! ५० इच्छुकांनी घेतले अर्ज
करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी अपक्ष, माजी आमदार पाटील यांनी महाविकास आघाडी (शरद पवार यांची राष्ट्रवादी), मकाईचे माजी अध्यक्ष बागल यांनी महायुती (शिवसेना शिंदे गट), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सागर लोकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांचा एबी फॉर्म प्राप्त झालेला नाही. प्रा. झोळ यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
संभाजी भोसले, निवृत्ती पाटील, सिद्धांत वाघमारे, विकास आलदर, माया झोळ, दत्तात्रय शिंदे, संजय शिंदे, अभिमन्यू अवचर, बहुजन समाज पार्टीकडून संजय शिंदे, कल्याण खाटमोडे, गणेश घुगे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) (नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्ष), शहाजन शेख (बहुजन महा पार्टी (नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्ष), यशवंत शिंदे, धीरज कोळेकर, उदयसिंह देशमुख, धीरज कोळेकर, संभाजी उबाळे, संजय शिंदे, जितेंद्र गायकवाड, ऍड. मोहम्मद शेख, जालिंदर कांबळे, ऍड. महादेव कदम बहुजन समाज पार्टी, विनोद सीतापूरे, गणेश भानवसे, मधुकर मिसाळ, अशोक वाघमोडे, बाळासाहेब वळेकर आदींचे अर्ज दाखल झाले आहेत.
‘ही’ आहेत वैशिष्टये…
१) संजय शिंदे नावाचे चार अर्ज दाखल : करमाळा विधानसभा मतदारसंघात संजयमामा शिंदे यांच्यासह संजय शिंदे नावाच्या चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
२) दिग्विजय बागल यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
३) माजी आमदार नारायण पाटील यांनी शेवटच्या दिवशीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
४) दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव व प्रा. रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल.
५) सोमवारी अर्ज दाखल करताना दिग्विजय बागल यांच्याबरोबर फक्त महिलाच होत्या.
६) कोणाचेही शक्ती प्रदर्शन नाही.
७) प्रमुख लढत मानली जात असलेल्या उमेदवारांमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांनी सुरुवातीला साधेपणाने अर्ज दाखल केला. त्यानंतर आमदार शिंदे, बागल व प्रा. झोळ यांनीही साधेपणाने अर्ज दाखल केले.
८) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी कोणताही गाजावाजा न करता शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला.
९) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला चौघांनाच (उमेदवारासह पाच) आतमध्ये प्रवेश.
१०) निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचे योग्य नियोजन.