करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात जीन मैदान परिसरात बेकायदा दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कॉन्स्टेबल हरिदास निमगिरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून जाकीर तैमूर सय्यद (वय ३८, रा. मोहहला गल्ली, करमाळा) असे संशयिताचे नाव आहे. संबंधित संशयित जीन मैदान येथे १ तारखेला बेकायदा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून ८०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
सावडीत एकाविरुद्ध गुन्हा
करमाळा : सावडी येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक प्रमोद गवळी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला असून पांडुरंग बाबू चव्हाण (वय ६५, रा. सावडी, ता. करमाळा) असे संशयिताचे नाव आहे. संबंधित संशयित ३१ तारखेला बेकायदा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून २३०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.