करमाळा : करमाळा पोस्ट कार्यालयासमोर येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी आईस्क्रीमचा गाडा उभा केल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल दीपक कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, करमाळा शहरातील जेऊर रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. येथे नागरिकांची नेहमी वर्दळ सुरु असते. महाविद्यालय सुरु झाल्याने येथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र रस्त्यात आईस्क्रीमचा गाडा उभा केल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. शिवाय नागरिकांना अडथळा ठरत आहे. त्यामुळे गाडा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्ट कार्यालयासमोर गाडा उभा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
