करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठेतील श्रीराम मंदिरासाठी करमाळ्यातील मुस्लिम बांधवांनी सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला होता. करमाळा येथील वेताळ पेठेतील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. येथेही सोमवारी (ता. 22) श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
करमाळा शहरात मुस्लिम बांधवांकडून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे मार्गदर्शक समीर शेख यांच्या कल्पनेतून सतत विविध उपक्रम राबविले जातात. सामजिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. श्रीराम मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. यावेळी ऍड. डॉ. बाबूराव हिरडे, श्रीराम मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय देशपांडे, राधेश्याम देवी, श्रीधर सुर्यपुजारी, भरत वांगडे, दर्शन कुलकर्णी, विवेक देशपांडे, उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आझादभाई शेख, जामा मस्जिद करमाळाचे अध्यक्ष विश्वस्त जमीर सय्यद, डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष जाहागीर बेग, आलीम खान, दिशान कबीर, रमजान बेग आदीच्या कल्पनेतून उपक्रम राबविले जातात.