करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजयी निश्चित असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळ्यात फटाके फोडत जल्लोष केला आहे. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा केला आहे. (अजून अधिकृत निकाल आलेला नाही.)
माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले होते. त्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतली होती. त्यांना विजयी करण्यासाठी शरद पवार यांची करमाळ्यात सभा झाली होती. तेव्हा माजी आमदार नारायण पाटील यांनी पवार गटात प्रवेश केला. मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी करमाळ्यात पाटील यांच्यासह सुभाष गुळवे, सुनील सावंत, प्रा. रामदास झोळ, डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, देवानंद बागल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, ऍड. शिवराज जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नलिनी जाधव, प्रा. गोवर्धन चवरे, सचिन नलवडे आदींनी परिश्रम घेतले होते. करमाळ्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.