करमाळा (सोलापूर) : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 24 ऑगस्टपर्यंत ‘कृषी योजनांचा माहिती मेळावा’ असे कार्यक्रम घेतले जात आहेत. यातूनच लिंबेवाडीमध्ये करमाळा तालुका कृषी विभागाच्या वतीने हा मेळावा होत आहे. या कार्यक्रमांमध्ये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाअंतर्गत व्यक्तिगत, शेतकरी गट, उत्पादक कंपनी यांना विविध अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया, छाननी प्रकिया, प्रशिक्षण व विविध अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज म. बोबडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
तालुका कृषि अधिकारी करमाळा संजय वाकडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, शेतकरी मासिक, पीक स्पर्धा योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध घटक, रा. कृ. वि. यो. अंतर्गत विविध घटक, कृषी यांत्रिकीकरण, स्मार्ट प्रकल्प, कृषी विभागाचे युटूब, फेसबुक, ट्विटर चॅनल, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रलंबित Ekyc व आधार लिंकिंग प्रक्रिया, MREGS फळबाग, फुंडकर फळबाग, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, भरडधान्यांचे महत्त्व तसेच कृषी सहाय्यक दत्ता वानखडे यांनी mahadbt अर्ज करण्याची प्रक्रिया, त्याकरता आवश्यक दस्ताऐवज, अनुदानाचे स्वरूप यावर मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण, कृषी पर्यवेक्षक संदीप गायकवाड, कृषी सहायक ज्ञानदेव खाडे, विजय सोरटे, दीपक खलसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहायक दादा नवले यांनी तर आभार गणेश सानप यांनी मानले.