करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी सध्या ‘होम टू होम’ प्रचार सुरु झाला आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्टेची केली असल्याचे चित्र असून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. त्यातूनच सर्व यंत्रणा कामाला लागली असल्याचे दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरुद्ध महायुतीचे उमेदवार खासदार निंबाळकर यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाचे दिग्विजय बागल यांचा गावागावात जाऊन प्रचार सुरु आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, आरपीआय (ए), रयत क्रांती, रासपडकवून हा प्रचार सुरु आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान आहे. हा प्रचार शेवटच्या टप्यात आला आहे. निंबाळकर व मोहिते पाटील या दोघांकडूनही प्रचाराचा वेग वाढला आहे. रविवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता प्रचार सांगता होणार आहे. त्यापूर्वी भाजपचे उमेदवार निंबाळकर यांच्यासाठी आमदार शिंदे यांच्याकडून करमाळ्यात ‘होम टु होम’ प्रचार सुरु आहे.