करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निंबध स्पर्धा होणार आहे. ३ ते १२ एप्रिल दरम्यान यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले निंबध पाठवावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. बहुजन बांधवांचे लेखन व वाचन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्याला प्रमोद गायकवाड यांच्या वतीने १०००, द्वितीय क्रमांक येणाऱ्याला प्रसन्नजीत कांबळे यांच्याकडून ७०० रुपये, तृतीय क्रमांक येणाऱ्याला भीमराव कांबळे यांच्याकडून ५०० रुपये व उत्तेजनार्थ म्हणून ज्ञानदेव कांबळे व विश्वास कांबळे यांच्याकडून ४०० रुपये बक्षीस मिळाले आहे. १३ एप्रिलला हे बक्षीस वितरण होणार आहे. ८४८४०२९४७९ या व्हाट्सप क्रमांकावर निंबध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर निंबध पाठवावेत.


