करमाळा (सोलापूर) : मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी असण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून उजनीतूनच उचल पाणी घेऊन या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. जनसंवाद गावाभेट दौऱ्या दरम्यान वडगाव उत्तर येथे ते बोलत होते.

बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, माजी उपसभापती दत्ता सरडे, महादेव गायकवाड, गणेश अंधारे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब भांडवलकर, शैलेश शेगडे, बाळासाहेब गाडे, सुदाम काळे, राहुलनाना शिंदे, सतीश शेगडे, डॉ. रोडगे, बबन भांडवलकट, बाळासाहेब गाडे, दादा थोरात, जालिंदर रोडगे, डॉ. प्रवीण रोडगे, शिवाजी माने, परशुराम शेगडे, बाळू अध्यक्ष, बजरंग पवार, सचिन अंधारे, प्रवीण जोशी, बापू जोशी, राजू माने, व्यकट पाटील, विठोबा जगदाळे, पांडुरंग भांडवलकर, नाना रोडगे, ज्ञानदेव लोंढे, धनराज अंधारे, हरिभाऊ शिंदे, गणिभाई पठाण, शुभम थोरात, राजेंद्र थोरात, बापू थोरवे, नागनाथ जगदाळे आदी उपस्थित होते.

माजी आमदार पाटील म्हणाले, कुकडी प्रकल्पावर अवलंबून राहून या भागातील शेतीचा प्रश्न अधिक गंभीर होत गेला. २५० किलोमीटरहून येणाऱ्या पाण्याची वाट पाहण्यापेक्षा तालुक्यातीलच असलेल्या उजनी धरणातून या तलावात पाणी आणता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी राज्याच्या सभागृहात हा प्रश्न मांडण्यासाठी मला पदाची ताकद द्यावी. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन हा माझा संकल्प असून मांगी परिसरासह रावगाव आणि वीट गटातील सुमारे ६५ हजार जिरायात शेतजमीनीस कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. मला विकासकामे करून दाखवण्यासाठी सत्ता हवी आहे. आमदार म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून या पदावरून करमाळा तालुक्यातील विकासासाठी अहोरात्र झटण्याची आपली तयारी असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *