काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करत राहणार : करमाळा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघमारे यांची निवड

करमाळा (सोलापूर) : ‘सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करून काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे’, असे प्रतिपादन करमाळा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे नूतन अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी केले.

काँग्रेस युवक प्रदेशचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुका काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात वाघमारे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. करमाळा तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी पोपळज येथील संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली.

वाघमारे म्हणाले, ‘काँग्रेस वाढीसाठी गाव तिथे शाखा व शाखा तिथे कार्यकर्ते तयार करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.’ करमाळा तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुकाध्यक्ष देवराव सुकळे, युवकचे शहराध्यक्ष सुजय जगताप, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, योगेश राखुंडे, चंद्रकांत साळवे, राहुल दामोदरे, दादा आरणे, नितीन आरणे, नितीन चोपडे, प्रतीक जगताप, अजय कांबळे, यश कांबळे, विजय कांबळे, आबासाहेब आवटे, अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *