करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारकडून बांधकाम कामगारांना विविध योजना दिल्या जातात. त्यासाठी सरकारकडे नोंदणी आवश्यक असून त्यात गरजेनुसार बांधकाम कामगारांना अपडेट करण्याची सुविधा देण्यात आलेली असते. मात्र सध्या या अपडेटचे काम बंद आहे. त्यामुळे संबंधित कामगारांची गैरसोय होत असून मदत केंद्र चालकांची ही डोकेदुखी वाढली असून अपडेटचे काम सुरु होईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांना तालुक्यातच सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारने सुविधा केंद्र काढले आहे. या केंद्रामुळे लाभार्थीना सुविधा निर्माण झाली आहे. सुविधा केंद्रावर मोफत नोंदणी केली जात आहे. नोंदणीचे काम सध्या सुरु आहे. मात्र नोंदणीमध्ये अपडेट करण्याचे काम साईट बंद असल्याने काम बंद आहे. साईट सुरु झाल्यानंतर पुढील काम सुरु होणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करमाळ्यात जीन मैदानात बांधकाम कामगार नोंदणी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे नागरिकांची सोय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.