करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलचे शुक्रवारी (ता. २८) वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटशिक्षणाधिकारी जयंत नलवडे, पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. रामराजे भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, केंद्रप्रमुख राजकुमार खाडे, इरा पब्लिक स्कूलचे संस्थापक डॉ. ब्रिजेश बारकुंड आदी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक घुगे यांनी गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्रगतीचा आलेख सांगत कौतुक केले. नलवडे यांनीही मुलांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम दोन थीममध्ये झाला. नर्सरी ते पहिली पर्यंत साउथ थीम ठेवण्यात आली होती त्यात ३५० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या थीम वर २० गाणी बसवण्यात आली होती. दुसरी ते पाचवीपर्यंत लखलख चंदेरी या थीममध्ये ५०० हुन अधिक विद्यार्थी सहभागी होते. या थीमवर ३६ गाणीबसवण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीमधील सार्थक सूर्यवंशी व विद्यार्थिनी ऋचा देशमुख, स्वाती सपकाळ आणि श्वेता ओव्हाळ यांनी केले. हे सूत्रसंचालन इंग्रजी, हिंदी व मराठीमधून होते. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व रेश्मा भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. HOD सारिका शिंदे, शितल पवार यांच्यासह शिक्षक व कर्मचारी तसेच वाहन चालक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


