करमाळा : बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत गटाचे विलास दळवी यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बेंडारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानदेव मुरुमकर, गोकुळ दळवी, शिवाजी बाबर, बापू घोडके, अभिजित वाघमोडे, प्रशांत पवार, दत्ता वाघमोडे, संदीप वाघमोडे, सिंधूबाई मुरुमकर, मिनाक्षी निकम, सचिव अनिल माने उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर दळवी यांचा सत्कार विठ्ठल सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोपाळ सावंत, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांचे संचालक ऍड. राहुल सावंत, सुनील सावंत, दौलत वाघमोडे, माजी सरपंच महारुद्र दळवी, माजी उपसरपंच गणेश जाधव, हनुमंत सावंत, अशोक मुरुमकर, भाऊसाहेब मुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, महादेव गवळी, शिवाजी दळवी, गौतम दळवी, गणेश मुरुमकर, लोकेश वाघमोडे, तुषार मुरुमकर, दादासाहेब नलवडे, रामहरी दळवी, हरी मोरे, हावीन गायकवाड, शरद वाडेकर, संकेत वाघमोडे, महेश मुरुमकर, शरद दळवी आदी उपस्थित होते.