भिगवण : दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळेला भेट दिली. दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादा सूर्यवंशी, सचिवा माया झोळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट झाली.
ग्रामीण रुग्णालय रुई येथील रुग्णालयास भेट देऊन तेथील क्ष- किरण विभाग, औषध विभाग, रोग निदान विभाग व अतिदक्षता विभागास भेट देऊन, रुग्णालयाचे कामकाज कशा प्रकारे चालते? तेथील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णाची भेट घेऊन माहिती घेतली. विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळा या ठिकाणी जाऊन कच्च्या मालाचा विभाग, पक्क्या मालाचा विभाग, विश्लेषणात्मक विभागात क्यूएक्यूसी, तयार औषधे व औषध वनस्पती उद्यान या विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली.
वॉटर पुरिफिकेशन, प्लांट गार्बेज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी तेथील विविध प्रकारच्या विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची संपूर्ण माहिती घेतली. महाविद्यालयांमधील प्रा. श्रेयस बंडगर, प्रा. रणजीत साखरे व प्रा. रक्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत वरील सर्व ठिकाणची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात संधी बाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.