करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेजचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये सायली भैरवनाथ झोळ या विद्यार्थिनीला ९५.२० टक्के, रिद्धी भाऊसाहेब चोरमले या विद्यार्थिनीला ८९.४० टक्के तर भाग्यश्री माधव बंडगर या विद्यार्थिनीला ८८.४० टक्के गुण मिळाले आहेत.
वाशिंबे केंद्रात सायली भैरवनाथ झोळ या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला आहे. तिला गणित, विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत. रिद्धी भाऊसाहेब चोरमले या विद्यार्थ्यीने हिंदीत १०० पैकी ९५ व मराठीत १०० पैकी ९३ गुण मिळवले. प्रशालेचे ९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी, सचिवा माया झोळ, स्कूल डायरेक्ट नंदा ताटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, स्कूलचे प्राचार्य विजय मारकड यांनी अभिनंदन केले.