करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री परिसरात रस्त्याच्याकडेला आज (शुक्रवारी) सकाळी एका कोल्ह्याचा मृत्यू आढळून आला आहे. कोल्ह्या ठार झाल्याची गेल्या काही दिवसातली ही तिसरा घटना आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.
करमाळा- जामखेड रस्त्यावर पोथरे परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी एका कोल्ह्याला अनोळखी वाहनाने धडक दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याच रस्त्यावर कामोणे फाटा परिसरात एका कोल्ह्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बिटरगाव श्री परिसरात एक कोल्हा ठार झाला आहे. रस्त्याच्या बाजूला कोल्ह्याचा हा मृतदेह पडलेला आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून सध्या पाणी टंचाईमुळे पाण्याच्या व चाऱ्याच्या शोधात तर त्यांची भटकंती सुरु नाहीना असा प्रश्न असून याकडे वनविभागाने लक्ष यावे, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.