करमाळा (सोलापूर) : खांबेवाडी येथील अयोध्या नगर सुपनवरवस्ती येथे आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त व हभप विठ्ठलआबा सुपनवर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली गोशाळेच्या वतीने आज (सोमवारी) दीपोत्सव होणार आहे. त्यानंतर हभप युवा कीर्तनकार प्रतीक्षा बनकर, हभप बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी सुपनवर यांचे शास्त्रीय भजन होणार आहे. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केला जाणार आहे; अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली आहे.

