करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाईवर मत करण्यासाठी प्रत्येक विभागात विंधन विहीर घेण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे. सध्या पाणी टंचाई निर्माण झाली असून नियमित पाणी पुरवठा होत नसून ४ ते ५ दिवसाने पाणी मिळत आहे. त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे.
माने यांनी म्हटले आहे की, सध्या रमजान सुरु असून करमाळा शहरामध्ये निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहरात पाण्याचे टँकर सुरु करुन प्रत्येक प्रभागात विंधन विहीर घेऊन पाण्याची भटकंती थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात होणारी खाजगी पाणी पुरवठादारांकडून होणारी आडवणूक बंद होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नगरसेविका राजश्री माने यांनी करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.