५५ पेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

Demand for exclusion of teachers above 55 years of age from election work

करमाळा (सोलापूर) : विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्ती देताना 55 पेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ५५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक प्रश्न गंभीर स्वरूपाचे असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, मुळव्याधी यासारख्या आजारांची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात. निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना इतर तालुक्यात जावे लागते. दोन दिवसांच्या निवासासाठी इतर तालुक्यात राहावे लागते. निवडणुकांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने या कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. निवडणूक कामातील ताण तणावमुळे या कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

तालुक्यातील 55 त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याची विनंती त्यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन करमाळा तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आले. शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड, कोषाध्यक्ष गोरख ढेरे, सचिव सचिन गाडेकर यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. यावेळी संघटनेचे सदस्य चोरमले, शिंदे, आढाव, ॲड. ढेरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *