करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीची व्यप्ती वाढू लागली आहे. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील विविध संघटनेच्या व्यापाऱ्यांनी आज (शुक्रवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. यावर आमदार शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शहराच्या सुरक्षेबाबत कसलाही चिंता नसावी त्वरीत यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणचे व मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, चेतन किंगर, सोलापूर जिल्हा सराफ व सुर्णकार असोसिएशनचे राधेश्याम देवी, कै. बल्लाराम वस्ताद बाहेर तालीमचे भैय्या राठोड, करमाळा तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रिगिस्ट असोसिएशनचे रविद्र बरीदे, करमाळा कापड असोसिएशनचे पप्पु सिंधी, केशव प्रतिष्ठाण व भाजपचे शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल, लोकमान्य टिळक मंडळाचे अतुल फंड, स्नेहल कटारीया, करमाळा डाॅक्टर असोसिएशनचे डाॅ. सुहास कुलकर्णी, रहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थाचे आझाद शेख, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळचे संजय सावंत, श्री. गिरदरदास देवी प्रतिष्ठाणचे कन्हैयालाल देवी, करमाळा तालुका लॅब असोसिएशनचे नेर्लेकर,
करमाळा जेष्ठ नागरिक संघटनाचे चोपडे, लक्ष्मीकांत ठोंबरे, रीध्दी सिध्दी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्थाच्या भावना गांधी, करमाळा मोबाईल डिलर असोसिएशनचे राजेश कटारीया, खोलेश्र्वर आरती मंडळ नागेश गुरव यांच्यासह विनय ननवरे, माजी नगरसेवक प्रविण जाधव, डाॅ. अविनाश घोलप, दीपक थोरबोले, जोतीराम लावंड, यश दोशी, अशोक गोफणे, योगेश काळे, यश जाधव, संजय भालेराव, राजाभाऊ बागल, सुरज शेख, शहाजी ठोसर, नरेंद्र ठाकुर, विश्र्वनाथ घोलप, नानासाहेब मोरे, अशपाक जमादार, अजिंक्य पाटील, फुरकान काझी, नागेश दुधाट, आकाश कवडे, अमर करंडे, स्वप्निल कवडे, सचिन कणसे, सोनु झाडबुके, कोथमिरे, राजाभाऊ कुभांर, संतोष घोलप, गोट्या जाधव, विवेक ननवरे, वैभव गायकवाड आदींनी या मागणीला पाठींबा दिला आहे.